भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवृत्तिदेव म्हणे ऐसें म्हणों नये

nivruttidev mhane aisen mhanon naye

निवृत्तिदेव म्हणे ऐसें म्हणों नये । धन्य भाग्यें पाहे संत आले ॥१॥ आपुलें स्वहित करावें आपण । संतांच्या सन्माना चुकों नये ॥२॥ धन्य हो ते नर राहाती पंढरीं श्वान । त्यांचे घरीं सुखें व्हावें ॥३॥ नामदेवा संगें देवाचा हो वोढा । प्रेमें केला वेडा पांडुरंग ॥४॥ निवृत्ति म्हणे त्यासी न म्हणे आरे । तुरे बाई ठेवितां बरें डोई माते ॥५॥ म्हणे मुक्ताबाई घाला लोटांगण । आपणां दर्शन नलगे त्याचें ॥६॥