भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्गुणाचे डाळीं पाळणा लाविला

nirgunache dalin palana lavila

निर्गुणाचे डाळीं पाळणा लाविला । तेथें सुत पहुडला मुक्ताईचा ॥१॥ निज निज बाळा न करी पैं आळी अनुहात टाळी वाजविते ॥२॥ तेथे निद्रा ना जागृती भोगी में उन्मनी लक्ष तो भेनि निजना तो॥३॥ निभ्रांत पाळी पाळणा विणवूनी मन हैं बांधोनि पवन दोरी ॥४॥ एकाविस सहस्र सहाशे वेळे बाळा। तेही डोळा स्थिर करी ॥५॥ निद्रा ना जागृति निजसी वा काई परियेसी चांगया बोले मुक्ताबाई ॥६॥