भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं छाया माया प्रकृतीच्या आया

nahin chhaya maya prakrutichya aya

नाहीं छाया माया प्रकृतीच्या आया । मनाच्या उपाया न चले कांही ॥१॥ तें रूप स्वरूप अपार अमूप । यशोदे समीप खेळतसे ॥२॥ विश्वाचा विश्वास विश्वरूपाधीश । सर्वत्र महेश एकरूपें ॥३॥ निवृत्ति सर्वज्ञ नाममंत्रयज्ञ । सर्व हाचि पूर्ण आत्माराम ॥४॥