भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणती घेतल्या आम्ही धान्य कोडी

mhanati ghetalya amhi dhanya kodi

म्हणती घेतल्या आम्ही धान्य कोडी । खर्चायला कवडी धार नसें ॥१॥ हांसती रडती पडती एकमेकांवर आनंदाला पार नाही म्हणती ॥२॥ काय गुणे देव रिझाला त्यावरी । मेसाचा फटकुरी जन्म गेला ॥३॥ पाहोन दारिद्र्य झालो कांसाविस । केवळ परीस पांडुरंगा ॥४॥ लहानसी मुक्ताई जैसी सनकाडी । केले देशोधडी महान संत ॥५॥ सगळेची काखेसी घेईन म्हणे ब्रह्मांड । नामा म्हणे पाखंड दिसते मज ॥६॥