भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागिल्या जन्माचा सांगितला विचार

magilya janmacha sangitala vichar

रचनाकार: संत बोधले · अभंग
मागिल्या जन्माचा सांगितला विचार । दाविली साचार साक्ष मज ॥१॥ तेंव्हा माझे मन जाले समाधान । एरवी अनुमान होता मज ॥२॥ साक्षतेची पहावा साक्षतेची घ्यावा । मग समाधान जीवा वाटे थोर ॥३॥ बोधला म्हणे नव्हे हे बोधाची कहाणी । आपले नयनी देखियले ॥४॥