भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय मी करितो कशाने तरतो

kay mi karito kashane tarato

रचनाकार: संत बोधले · अभंग
काय मी करितो कशाने तरतो । नाम तुझे घेतो एक भावे ॥१॥ नाम तुझे वाणी बोबडिया बोला । न ये मज चाली करु काय ॥ २ ॥ न ये मज गाणे न ये मज नाचणे । भावे आलो शरण तुझे पायी ॥३॥ बोधला म्हणे देवा तु मज बोधिले । आवडीने ठेविले नाम माझे ॥४॥