भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेथें नाहीं वेदु नाहीं पै शाखा

jethen nahin vedu nahin pai shakha

जेथें नाहीं वेदु नाहीं पै शाखा । द्वैताचा हा लेखा हरपला ॥ १ ॥ तें रूप वोळलें नंदायशोदे सार । वसुदेवबिढार भाग्ययोगें ॥ २ ॥ नमाये पुरत ब्रह्मांडाउभवणी । त्यालागीं गौळणी खेळविती ॥ ३ ॥ निवृत्ति ब्रह्मसार सेवितुसे सोपें । नामें पुण्यपापें हरपती ॥ ४ ॥