भजनी मालिका
← भजनांकडे परत

जवळी असता राम अंतरला दुरी

javali asata ram antarala duri

रचनाकार: संत बोधले · अभंग
जवळी असता राम अंतरला दुरी । माया मोहो जाळे कैसा वाहोली दुरी ॥१॥ देहेक सृजा भोगुनी जोडियेली जोडी । अंतकाळे जाता नये फुटकी कवडी ॥ २॥ जंवरि देह बळ तंववरी जिंकावा हा काळ । आठवा रघुवीरा हेची सोडवण करा ॥३॥ बोधला म्हणे का रे भुललेसी । सोडुनीया भ्रांती शरणे जावे विठ्ठलासी ॥४॥