भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मोजन्मी आमचा केला प्रतिपाळ

janmojanmi amacha kela pratipal

रचनाकार: संत बोधले · अभंग
जन्मोजन्मी आमचा केला प्रतिपाळ । करितसे सांभाळ रात्री दिवस ॥१॥ तरि तू आमचा मातापिता । सोयरा सर्वथा निवारिली वेथा जन्मांतरिची ॥२॥ फेडियेले रिण तोडियेले हिण । कैसी मोहियेले मन पांडुरंगा ॥३॥ अनंत कोटी आमच्या पातकाच्या रासि । त्या तु हृषीकेशी दुर केल्या ॥४॥ नाही विचारिले दोष आमचे काही । बांधलेस पायी बोधला म्हणे ॥५॥