भजनी मालिका
← भजनांकडे परत

जडमूढ पाषाण न घडे तुझी सेवा

jadamudh pashan na ghade tujhi seva

रचनाकार: संत बोधले · अभंग
जडमूढ पाषाण न घडे तुझी सेवा । पतीत केशवा जन्मा आलो ॥१॥ सदाचा अवगुणी नावडे जनासी । तरी तुवा हृषीकेशी आंगीकारिले ॥ २॥ अनंतकोटी आमच्या पातकांसी रासी । त्या घातलिया पोटासी पांडुरंगा ॥३॥ माता पितियाची उपमा तुझे देता । लाज माझीया चित्ता वाटताहे ॥४॥ पीतीयाचा पुत्र अपराध करिता । गणती नको दाऊ आमुख आम्हा ॥५॥ ऐसीयाची उपमा तुजलागी न सहे । तुजवाचुनी कोण आहे थोर देवा ॥६॥ बोधला म्हणे देवा तुवा जगी उध्दारीले । पतीत पावन जैसे केले नाम साचे ॥७॥