भजनी मालिका
← भजनांकडे परत

ही तव निर्लज्ज निष्ठुर

hi tav nirlajja nishthur

रचनाकार: संत बोधले · अभंग
ही तव निर्लज्ज निष्ठुर । यासी नाही आरपार ॥१॥ याची संगती धरुन काये । आपण जैसे करीत आहे ॥ २ ॥ जैसा संगीताचा गुण । याने व्यापिले त्रिभुवन ॥३॥ बोधला म्हणे न साहे दुजियाचा वारा । धरी संतांचा आसरा ॥४