भजनी मालिका
← भजनांकडे परत

हातांत नरोटी जीर्णाचे ते

hatant naroti jirnache te

हातांत नरोटी जीर्णाचे ते । भार म्हणसी सौदागर संत माझे ॥१॥ परळ भोपळ्याची गृहामाजी संपत्ती । तुम्ही का श्रीपति भूषण सांगा ॥२॥ भणंगाचे घरा नित्यची राजपट । सांगसी अचाट ब्रीद त्यांचे ॥३॥ कैकाड्याचे वाणी करिती गूडगूड । मजला हे गूढ समजेना ॥४॥ नामा म्हणे गाती प्रकाशाचे । गाणे आम्हां अोवादितसे॥५॥