भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिदास संगे हरिदास खेळे

haridas sange haridas khele

हरिदास संगे हरिदास खेळे । ब्रह्मादिक सोहळे भोगिताती ॥ १ ॥ संतमुनिदेवसनकादिक सर्व । तिहीं मनोभाव अर्पियेला ॥ २ ॥ पुंडलिकफळ वोळले सकळ । शंकर सोज्वळ प्रेमें डुले ॥ ३ ॥ निवृत्ति लोळत चरणरजीं लाटा । माजि त्या वैकुंठा आत्मलिंगीं ॥ ४ ॥