भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुज गोप्ये गोष्टी

guj gopye goshti

रचनाकार: संत बोधले · अभंग
गुज गोप्ये गोष्टी। हो त्या तुझे पोटी । त्या त्वा जगजेठी सांगितल्या ॥१॥ ऐसा तु आम्हासि कृपाळु जालासि । जैसा पांडवांसि वेळा आतु ॥२॥ बोधला म्हणे देवा तू दीनांचा दयाळू । कोवळा कैवल्ये केले बापा ॥३॥