भजनी मालिका
← भजनांकडे परत

एव्हडिये दुरुनी आलो तुज कारणे

evhadiye duruni alo tuj karane

रचनाकार: संत बोधले · अभंग
एव्हडिये दुरुनी आलो तुज कारणे । भेटी दे निधाने पांडुरंगे ॥१॥ भेटी मज देसि आहे तुझी दासी । म्हणोनी आलो चरणापाशी ॥ २ ॥ तरी बापा तारिशिल मज । शरण आलो तुज ॥ २॥ राख माजी लाज | येहि काळी ॥३॥ राखसिल लाज शरण आलो तुज । येइ चरणिचे रज बोधला म्हणे ॥४॥