भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य हा खेचर धन्य हा सोपान

dhanya ha khechar dhanya ha sopan

धन्य हा खेचर धन्य हा सोपान । भक्तीचें जीवन जनक हेतु ॥ १ ॥ धन्य याचें कूळ पवित्र कुशळ । नित्य या गोपाळ जवळी असे ॥ २ ॥ याचेनि स्मरणें नासती दारुणें । कैवल्य पावणें ब्रह्मामाजी ॥ ३ ॥ निवृत्ति म्हणे परब्रह्म हें साकार । तेथील अंकूर उमटले ॥ ४ ॥