भजनी मालिका
← भजनांकडे परत

चरणी घागऱ्या घुळ घुळर

charani ghagarya ghul ghular

रचनाकार: संत बोधले · अभंग
चरणी घागऱ्या घुळ घुळर । त्यापरि वाकि वाजति मंजुळ रे ॥१॥ कैश्या गोपिका शोभति दोहि भागि रे । आपण कृष्ण खेळता कैसा रंगि रे ॥ २॥ कैसा गोपाळास देतो शोभा रे। बोधला म्हणे हा उभा भीमातिरी । कैसा सवंगड्या वाटितो सिदोरी रे ॥४॥