भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलोनियां येर्णे वाढविला डांगोरा

boloniyan yerne vadhavila dangora

बोलोनियां येर्णे वाढविला डांगोरा । अंतरींचा कोरा गुरुविण ॥१॥ संतांचा सन्मान कळेना जयासी । राहुनि देवापाशीं काय केलें ॥२॥ परिसा झांकण घातलें खापर । नाहीं जाले अंतर बावनकस ॥३॥ खदिरांगारी शृंगारी हिलाल । अंतरींचे काळें गेलें नाहीं ॥४॥ म्हणे मुक्ताबाई अभिमानें नेलें । सर्पा पाजियेलें विष तेंचि ॥५॥