भजनी मालिका
← भजनांकडे परत

भावाचा भुकेला प्रीतीचा येलाइतू

bhavacha bhukela priticha yelaitu

रचनाकार: संत बोधले · अभंग
भावाचा भुकेला प्रीतीचा येलाइतू । हेचि तुझी भक्ती आणिक न लगे काही ॥१॥ ऐसा तु कृपाळू पाहे दीनालागी । भक्ती ज्याचे आंगी ते कृपा तुझी ॥ २ ॥ आता तु उदार दीन उध्दरावया । धने पंढरीराया कृपाळू वा ॥३॥ बोधला म्हणे देवा धन्य तुझा महिमा । स्वामी पुरुषोत्तमा पांडुरंगा ॥४॥