भजनी मालिका
← भजनांकडे परत

भरतें ना रितें आपण वसतें

bharaten na riten apan vasaten

भरतें ना रितें आपण वसतें । सकळ जग होते तयामाजी ॥ १ ॥ तें रूप पैं ब्रह्म चोखाळ सर्वदा । नित्यता आनंदा नंदाघरीं ॥ २ ॥ आशापाश नाहीं घरीं पूर्णापूर्ण । सकळ जग होणे एक्यारूपें ॥ ३ ॥ निवृत्ति तटाक ब्रह्म रूप एक । जेथें ब्रह्मादिक ध्याती सदा ॥ ४ ॥