भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहु दिवस बहु कष्ट सोसीले

bahu divas bahu kashta sosile

रचनाकार: संत बोधले · अभंग
बहु दिवस बहु कष्ट सोसीले । वाट म्या पाहिली विठो तुझी ॥ १ ॥ कृपाळु होउनी केधवा बा येसी । मज भेटी देसी चहु बाही ॥२॥ पोटासी धरुनि देसी आलिंगन । कुरवाळी वदन आपुले करे ॥३॥ बोधला म्हणे मी तुज लडिवाळ । घडी सांभाळ करी भाना ॥४॥