भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनंत सृष्टि घटा अनंत नाम मठा

anant srushti ghata anant nam matha

अनंत सृष्टि घटा अनंत नाम मठा । परिमाण पैठा आत्माराम ॥१॥ तें रूप साजिरें चतुर्भुजवेष । वैकुंठीचे लेख नंदभाग्य ॥२॥ सिद्धीचें साधन चिंतामणि धन । कल्पवृक्ष घन वसते जेथें ॥३॥ निवृत्तिचें मूळ गोपाळ सकळ । साधक दयाळ हरि होय ॥४॥