भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां जप नाम गुरुखूण सम

amhan jap nam gurukhun sam

आम्हां जप नाम गुरुखूण सम । जन वन धाम गुरुचेचि ॥ १ ॥ नेघों कल्पना न चढों वासना । एका पूर्णघना शरण जाऊं ॥ २ ॥ तप हें अमूप नलगे संकल्प । साधितां संकल्प जवळी असे ॥ ३ ॥ निवृत्ति म्हणे मज निरोपिलें धन । हेचि ब्रह्मखुण जाणिजेसु ॥ ४ ॥