भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमच्या संसाराचे घेतलेसे ओझे

amachya sansarache ghetalese ojhe

रचनाकार: संत बोधले · अभंग
आमच्या संसाराचे घेतलेसे ओझे । तुजवांचुनी दुजे नाही कोण्ही ॥१॥ ऐसा करुणानिधी आणिक नाही कोण्ही । तु जनक जननी मायेबाप ॥ २ ॥ कृपेचा कोवळा दीन दयानिधी । मज येऊनिया आधी सांभाळावे ॥३॥ रात्री दिवस आस लागली मनास । भेटी सावकाश द्यावी मज ॥४॥ तुझिया वचनास मज थोर आधार । हा शब्द निर्धार सत्य माझा ॥५॥ बोधला म्हणे मना लागलीसे आस । पाउले सावकाश पाहिन नयनी ॥६॥