भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमचा विठोबा विश्वाचा गोसावी

amacha vithoba vishvacha gosavi

रचनाकार: संत बोधले · अभंग
आमचा विठोबा विश्वाचा गोसावी । कारे तुम्ही जीवी आठवाना ॥१॥ लटकियाचा तुम्ही मानाल भरवसा । जातिल दाही दिशा सोडुनिया ॥२॥ माता आणि पिता बंधु या बहिणी । अंतकाळी कोणी नव्हती बापा ॥३॥ लटकिया मायेसी धरला जीवेसी । जातील परदेशी टाकोनिया ॥४॥ बोधला म्हणे तुम्ही साच जीवी धरा । निर्वाणीचा खरा पांडुरंग ॥५॥