भजनी मालिका
← भजनांकडे परत

आज मी राहिलो डोंगरी

aj mi rahilo dongari

रचनाकार: संत बोधले · अभंग
आज मी राहिलो डोंगरी। आनंद होतो ब्रह्मगिरी ॥१॥ पांचा तत्वाची दिवटी । निवद भरियेला ताटी ॥२॥ आनंदे घातला गोंधळ । होतो प्रेमाचा कल्लोळ ॥ ३॥ उदो बोला हा आनंद । काळ हरियेल छंद ॥४॥ बोधला म्हणे आनंद झाला । कळिकाळ हा जिंकीला ॥५॥