भजनी मालिका
← भजनांकडे परत

आदिरूप समूळ प्रकृति नेम

adirup samul prakruti nem

आदिरूप समूळ प्रकृति नेम । वैकुंठ उत्तम सर्वत्र असे ॥१॥ तें रूप संपूर्ण वोळलें परींपूर्ण । सर्व नारायण गोपवेष ॥२॥ आधारीं धरिता निर्धारीं । सर्वत्र पुरता एकरूपें ॥३॥ निवृत्ति साधन सर्वरूपें जाण । एकरूपें श्रीकृष्ण सेवितसे ॥४॥